मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता संपूर्ण देशवासियांना मेणबत्या आणि दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मोदींच्या या आवाहनावर विरोधकांनी टीका केलेली असतानाच शिवसेनेनेही पंतप्रधानांच्या आवाहनाची खिल्ली उडवली आहे. ‘लोकांना टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोक ढोल वाजवत रस्त्यावर आले. आता आग लावली नाही म्हणजे झालं,’ अशी खोचक टीका शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही खोचक टीका केली आहे. टाळ्या वाजवायला सांगितल्या तेव्हा लोकांनी रस्त्यावर उतरून ढोल वाजवले होते. आता आग नाही लावली म्हणजे झालं, अशी खोचक टीका करतानाच साहेब, कामाचं बोला आणि लोकांच्या पोटापाण्याचं बोला, असं आवाहनही राऊत यांनी केलं आहे.