तेलंगणा : भारतीय वायुसेनेच्या शिकाऊ विमान तेलंगणामध्ये अपघातग्रस्त झालं आहे. या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये भारतीय हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळल्याची बातमी समोर आली आहे. तेलंगणातील मेडक जिल्ह्यात ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताच्या वेळी विमानात एक ट्रेनर पायलट आणि एक ट्रेनी पायलट होते. या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडीगुल जिल्ह्याजवळील एअर फोर्स अकादमीमध्ये सोमवारी सकाळी प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी 8 च्या सुमारास हा अपघात झाला. मृत वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश आहे. अपघातानंतर विमानाने पेट घेतला. अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.