सोलापूर जिल्ह्यातील पाच खेळाडूंची महाराष्ट्राच्या किशोर खो-खो संघात निवड झाली आहे. कर्नाटकात १३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हे सहभागी होतील.
चिंचणी (पालघर) येथे झालेल्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून त्यांची निवड झाली आहे. तसेच किशोर संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी येथील उमाकांत गायकवाड यांची निवड झाली. त्यांचे सोलापूर सोलापूर ॲम्युचर खोखो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर, पदाधिकारी व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
निवड झालेले खेळाडू : अनुष्का विनोद पवार (अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ, वेळापूर) स्नेहा अनील लमकाने, समृध्दी पांडुरंग सुरवसे,कल्याणी सुनील लामकाने (कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली, पंढरपूर), संस्कार अशोक शिंदे (आदर्श क्रीडा मंडळ शेवते, पंढरपूर).