सोलापूर : कोरोना विषाणू विरुध्दच्या लढाईसाठी डॉ. रवींद्र श्रीपाद कुलकर्णी मदतनिधी ट्रस्ट मार्फत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 लाख व पीएम केअर फंडास दीड लाख अशी अडीच लाख रुपयांची मदत आज देण्यात आली. विश्वस्थ डॉ. सुनिल कुलकर्णी यांनी या रकमेचे धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केले.
जान्हवी अनिल नाईक हिने वाढदिवसासाठी जमवलेले 480 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले. अशोकनगर येथे राहणारी जान्हवी लिटल फ्लॉवर स्कुलमध्ये सहावीत शिकते.