तेलगंणा : तेलंगणामध्ये कामारेड्डी मतदारसंघात मतमोजणीच्या चार फेऱ्यांनंतर, BRS अध्यक्ष मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रमुख ए. रेवंत रेड्डी 13565 मतांनी आघाडीवर आहेत. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर आहे.
2014 मध्ये राज्याच्या स्थापनेनंतर प्रथमच सत्ताधारी बीआरएसला सत्तेतून खेचून काँग्रेसच्या विजयाचा अंदाज अनेक एक्झिट पोलने वर्तवला आहे. त्यामुळे मतदारांनी तिसर्यांदा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पसंती दिली की नाही हे स्पष्ट होईल. काँग्रेसच्या “सहा हमी” ने काही चमत्कार घडवून आणला की भाजप बिघडवण्याची भूमिका बजावेल हे संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल.
सिद्धीपेठमध्ये बीआरएस आघाडीवर
बीआरएसचे ज्येष्ठ नेते टी. हरीश राव सिद्धीपेट मतदारसंघात आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत टी. हरीश राव यांना 6294 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसला 666 मते मिळाली आहेत आणि भाजपच्या दुडी श्रीकांत रेड्डी यांना 615 मते मिळाली आहेत. ते राज्याचे अर्थ आणि आरोग्य मंत्री आहेत.
करीमनगरमध्ये भाजपचे बंडी संजय पिछाडीवर
करीमनगर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरीअखेर बीआरएसच्या गंगुला कमलाकर यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी भाजपचे बंडी संजय यांच्यावर 2405 मतांनी आघाडी घेतली आहे. बंडी संजय कुमार हे करीमनगरचे खासदार आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने त्यांना हटवले आणि किशन रेड्डी यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.