सोलापूर : महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड होताच सोलापुरात समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत आणि ‘जय भवानी जय शिवाजी, सुरेशअण्णा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी घोषणाबाजी करत भवानी पेठेत एकच जल्लोष करण्यात केला.
यावेळी अण्णांचे समर्थक मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जेमिनी मातेचे पूजन करून सुरेश पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार केला. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, भाजप युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अक्षय अंजीखाने, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य यतिराज व्हनमाने, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बसवराज जाटगल, बंडप्पा डोळ्ळे, सूर्यकांत झेंडेकर, निंगप्पा पुजारी, सायबण्णा मुडल, अप्पू उडागड्डे, सत्यनारायण बोगय्यागारू, किरण वल्लाल, दशरथ गंजळ्ळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा नेते बिपिन पाटील, विजय कोळी, पवन तगारे, नवीन गोटीमुक्कुल, रवी मंदकल, मुदका करली, मल्लिनाथ कोळी, आकाश जमादार, आनंद बुजले, शेखर इराबत्ती, यल्लप्पा करली, चिदानंद मासरेड्डी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी इरफान इनामदार, जमीर तांबोळी, इकबाल नारवार, अमीर शेख यांनी निवडीनंतर सुरेश पाटलांचा सत्कार केला.