सोलापूर : Yes News Marathi च्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण उद्योग वर्धिनीच्या संचालिका चंद्रिका चौहान तसेच इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी यांच्या हस्ते पार पडले. दीपावली पाडव्यानिमित्त ऑनलाइन स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ४० ते ४५ स्पर्धकांनी आपल्या रांगोळ्या Yes News Marathi कडे ऑनलाइन पद्धतीने पाठवल्या होत्या. यामध्ये प्रतिमा लांबतुरे यांना प्रथम क्रमांक, योगेश वाकडे यांना द्वितीय क्रमांक तर पूर्वा क्षीरसागर यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषक देण्यात आले. अमृता वडतीले आणि मंगल बागल यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
Yes News Marathi च्या कार्यालयात हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला. व्हिडिओ एडिटर शिवानंद जाधव यांनी सायली जोशी यांचे तर कॅमेरामन विजय आवटे यांनी चंद्रिका चौहान यांचे स्वागत केले. प्रारंभी शिवाजी सुरवसे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना इंडियन मॉडेल स्कूलच्या संचालिका सायली जोशी यांनी स्पर्धेचे कौतुक केले. उद्योगवर्धिनीच्या संचालिका तथा समाजसेविका चंद्रिका चौहान यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. बक्षीस विजेती पूर्वा क्षीरसागर हीने देखील यावेळी मनोगत व्यक्त केले