सोलापूर – कोरोना विषाणू संसर्ग भयानक रुप धारण करत आहे, या अनुषंगाने आपल्या देशात प्रशासन काळजी पूर्वक व्यवस्थापनाचे काम करीत, आहे यात शंका नाही शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे संसर्गला आळा बसत आहे. जनतेमध्ये भितीच वातावरण आहे ,अश्या वेळेस सो.म.पा. आरोग्य विभाग पाहिजे तेवढे काम करीत नाहीत ,सतत दुर्लक्षीत झालेला हा ,विभाग अचानक आलेल्या ह्या आपत्तीकालीन संकटला कशी तोंड देणार ..सो.म.पा. दवाखाने बरेच बंद आहेत, जे चालू आहेत ,त्याची अवस्था बेकार आहे ,दरवर्षी या विभागाला बजेट पण थोडे दिले जाते.
या दवाखान्यात जाणारा नागरिक गरीब असतो यांना आरोग्य सेवा मिळत नाही .. या संसर्गला तोंड देण्यास तशी तयारी या विभागाला कशी असणार ? देशात व जगात कोरोनाचा विळखा वाढत आहे, अनेक लोक मृत्यूमूखी पडत आहेत, लोक या संसर्गजन्य दहशतखाली आहेत ,सो.म.पा. ने प्रतीबंध उपाय करीता जोरात हालचाली कराव्यात, प्रशासन आपल्या सोबत काम करीत आहेतच, या संसर्ग कडे गंभीरतेने पाहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने केवळ रोगाचे निदान करणाऱ्या चाचण्या पुरेशा आहेत का ? या करीता कम्युनिटी ट्रान्समिशन बाबत खबरदारी आवश्यक आहे, अशी मागणी .म.फुले समता परिषद व भिमदल च्या वतीने शशीकांत कांबळे यांनी पञाद्वारे केली आहे. .सो.म.पा.ने आपत्तीकालन व्यवस्थापण कायद्या अंतर्गत जनतेच्या संरक्षणासाठी आपल्या अंतर्गत असलेल्या इमारती हॉल खोल्या समाजमंदीर ताब्यात घ्याव्यात, सो.म.पा .ने विषाणू संसर्ग प्रतींबधक निर्जंतुकिकरण औषध फवारणी करावी , लॉकडाऊन मुळे लोकांनी घरातच बसावे व स्वतःची कुंटूबाची काळजी करावी…यत असे आवाहन शशीकांत कांबळे यांनी केले आहे.