मुंबई : अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या चर्चेत आहेत. माधुरी दीक्षित-नेने आता लवकरच भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र सध्या अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरु नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. याआधीदेखील अशीच चर्चा रंगली होती. पण सध्या तरी राजकारणात प्रवेश करण्याचा माझा विचार नाही, असं म्हणत माधुरी दीक्षित यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण अशी कोणतीच चर्चा भाजपमध्ये सुरू नसल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. तसेच लोकसभेचं तिकीट कोणाला द्यायचं हा सर्वस्वी निर्णय केंद्रातून होणार नाही.
माधुरी दीक्षितला भाजपातर्फे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर माधुरी दीक्षित मुंबईतून भाजपातर्फे लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली.