सोलापूर : जगात व देशात महाभयंकर कोरोनो सारख्या साथीच्या रोगाने थेमान घातले असताना..या साथीच्या रोगावर आळा बसावा व गावात कोणत्याही प्रकारचा संसर्गचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून ग्रामपंचायत उळे तालुका दक्षिण सोलापुर यांच्या कडून आज गावात जंतुनाशकाची फवारणी करण्यात आली.
ही जंतुनाशक फवारणी करण्या साठी गावातील सरपंच सुरेश डांगे, ग्रामसेवक ए एम पठान, माजी उपसभापति अप्पा धनके, ग्रामपंचायत सदस्य अण्णा शिंदे, आबासाहेब भोसले, नितिन कुंभार, दत्ता खंडागळे, सीताराम जाधव, पोलीस पाटिल पांडुरंग कुंभार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिनेश शिंदे, एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे सह्याद्री फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष महमद पठाण, पी.जी सोशल फाउंडेशनचे आकाश रणसुरे, लक्की गायकवाड, भिम संदेश तरुण मंडळाचे विजय गायकवाड विकास रणसुरे, शिवनेरी तरुण मंडळाचे अध्यक्ष धनाजी राऊत, सुनील कोळी, दत्त तरुण मंडळाचे सुनील शिंदे, हरि भुसारे, जनार्दन शिंदे आदी कार्यकर्ते सामाजिक संघटना यांनी संपूर्ण गांव जंतुनाशक फवारणी करण्यासाठी परिश्रम घेतले.
जंतुनाशक फवारणी करते वेळी आरोग्य सहायक कोळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, रोजगार सेवक पिंटू कासार, ग्रामपंचायत शिपाई नाना शिंदे आदिच्या उपस्थित जंतुनाशक फवारणी करण्यात आली.