दिवाळी म्हणजे उत्साह.. दिवाळी म्हणजे आनंद.. दिवाळी म्हणजे प्रकाश.. याच दिवाळीचे स्वागत करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून सोलापूरच्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाच्या माध्यमातून सोलापूर सजविले आहे. त्यामुळेच गेल्या आठ दिवसापासून दिवाळी खरेदीची यंदा उच्चांकी गर्दी पाहायला मिळाली. मंद वारा.. घरासमोर रांगोळ्या आणि आकाश कंदील अशा उत्साही वातावरणात पहा विविध भागात आपली सोलापूर कसे प्रकाशात नाहून निघाले आहे.पहा लखलखती जणू चंदेरी सोनेरी नगरी अशीच वाटावी अशी आपली सोलापूरची हुतात्मा नागरी.
आता रात्री दहा वाजता दिवाळीमध्ये सोलापूर कसे दिसते हे पाहूया. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा म्हणजे सोलापूरचे प्रवेशद्वार. इथून पुढे जाताना विविध हॉटेल्स क्रोमा शोरूम बस स्टॅन्ड तसेच दुकाने रंगीबेरंगी लाईट्सनी सजवली आहेत. छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी अश्वारूढ पुतळा परिसर देखील छान दिसू लागला आहे. इथून पुढे नवीवेसच्या दिशेने जाताना भागवत थिएटर परिसर .. नवी वेस पोलीस चौकी. सरस्वती चौक ते चार पुतळा परिसर देखील दिवाळीच्या स्वागताला सज्ज आहे. रात्री दहा वाजता देखील पार्क चौपाटी.. पार्क स्टेडियम मधील गाळे परिसरात गर्दी दिसत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि विद्युत रोषणाईने नटलेली सोलापूर महापालिका इमारत ही नक्कीच आपले लक्ष वेधते. डफरीन चौक, जुना एम्प्लॉयमेंट चौक, हा. व्हीआयपी रस्ता आहे. हॉटेल कामत आणि तिथून पुढे सात रस्त्याकडे जाताना असलेली विविध ब्रँडेड ची शोरूम्स पाहिल्यावर सोलापूर नक्कीच श्रीमंत होत आहे याची जाणीव होते विविध सोन्याचे मॉल्स या परिसरात सुरू. सात रस्ता ते रंगभवन हा रस्ता देखील अनेकांचे लक्ष वेधतो. रंगभवन चौक- हरीभाई देवकरण प्रशाला डफरीन चौक- ते सरस्वती चौक हा मुख्य रस्ता नेहमीच रहदारीचा असतो रात्री दहा वाजता देखील इथे गर्दी दिसून आली. रात्री नऊ वाजेपर्यंत तुफान गर्दी असणारा सरस्वती चौक ते नवी पेठेकडे जाणारा रस्ता पहा रात्री दहा वाजता कसा दिसतोय तो. मुख्य नव्या पेठेतून दत्त चौकाकडे जाताना दिवसभर थकलेली बाजारपेठ बंद होताना दिसून आली. दत्त चौक.. आसरा मैदान येथे थाटलेली फटाके स्टॉलची दुकाने आणि भेळचे स्टॉल परिसरात गर्दीच गर्दी होती.