मुंबई : बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नोएडातील रेव्ह पार्टीवरील छाप्यादरम्यान एल्विश यादवसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गणपतीत एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावर एल्विश यादव आला होता. त्यानं गणपतीची आरतीही केली होती. याचे फोटो शेअर करत विरोधकांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे. नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला आहे. तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान गुन्हेगारांसाठी पर्यटनस्थळ झाले आहे का? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे
विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर एल्विश यादव सारख्या विषारी नशाबाजांचा सुळसुळाट झाला आहे शाल नारळ देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आदरतिथ्य करण्यात आले. शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर बोलावून आदरतिथ्य केले होत. त्याच्यावर सापाच्या विषापासून ड्रग्ज बनवणे, सेवन करणे आणि विकणे यासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांबाबत अपशब्द वापरणारा, विषारी ड्रग्स चे सेवन विक्री करणाऱ्या आरोपीचे आदरतिथ्य करून मुख्यमंत्री एल्विश यादव सारख्या नशाबाज तरुणांना राज्यातील तरुणांचे रोल मॉडेल बनवण्यात हातभार लावत आहे का? आधीच राज्यात ड्रग कारखाने सापडत आहेत. ललित पाटील शासकीय पाहुणचार झोडतो, मग पळवून लावला जातो आणि इथे वर्षावर नशाबाज आरती करतो हे महायुती सरकार आहे.