लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 31 ऑक्टोंबर रोजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या पदव्युत्तर विभागाचे प्रमुख डॉ. किरण जगताप उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पाजंली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गौतम जाधव यांनी केले यामध्ये त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. किरण जगताप यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये राष्ट्राची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा मोलाचा वाटा असून त्याचे कार्य सदैव भारतीय समाजाला प्रेरणा देत राहील असे सांगितले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थीनी . सुमित्रा चव्हाण हिने उपस्थिताना राष्ट्रीय एकता दिनाची शपथ दिली. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीशकुमार देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. कविता संभारम यांनी केले, तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. समाधान कदम यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्रा. स्नेहल मठे, प्रा. अमृता नन्नवरे, प्रा. मोनिका गुंड, डॉ. सुप्रतिक पालचौधरी, प्रा. तुकाराम जाधव, प्रा. सुजित पवार , क्रिंडा प्रशिक्षक वैभवराज चिपरे , अमित साबळे आदी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

