कंपनीचे मुख्यवित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुढाकारातून उपक्रम
सोलापूर- प्रिसिजन फाऊंडेशनच्या माध्यमातून सोलापूर स्थित श्री मार्कण्डेय सहकारी रुग्णालयास अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आज हस्तांतरण करण्यात आले. त्यावेळी प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ सुहासिनी शहा, प्रिसिजनचे कार्यकारी संचालक करण शहा, मार्कण्डेय रुग्णालायाचे चेअरमन डॉ विजय आरकाल, व्हाईस चेअरमन श्रीनिवास कमटम, संचालक डॉ माणिक गुर्रम, डॉ लता मेठापल्ली व प्रिसिजनचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रिसिजन कॅमशाफ्टस् लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचं कार्य या फाउंडेशनच्या माध्यमातून चालते. आरोग्य, शिक्षण, सामाजिक, शाश्वत विकास अशा विविध क्षेत्रात प्रिसिजन फाउंडेशन कार्य करते. प्रिसिजन फाउंडेशनने आरोग्याच्या क्षेत्रात मूलभूत सेवासुविधा पुरविण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीतील वित्त विभागातील कर्मचारी व कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी रवींद्र जोशी, आकाउंट्स विभागाच्या एजीएम आरोही देवस्थळी तसेच याच विभागातील कर्मचाऱ्यांनी कंपनीचे चेअरमन यतीन शहा यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चातून ही रुग्णवाहिका दिली. सामाजिक भावनेतून कंपनीच्या चेअरमनच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका देणे ही दुर्मिळ घटना आहे.
प्रिसिजनचे चेअरमन यतिन शहा यांच्या वाढदिवसानिमित्त गो ग्रीन हि मोहीम राबविणायत आली. कंपनीतील २५०० कर्मचाऱ्यांना झाडांचे वाटप करण्यात आले. प्रिसिजनने नेहमीच पर्यावरणाचा, वृक्ष लागडीचा विचार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रिसिजन मधील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी वृक्ष लागवड करावी या उद्देशाने प्रतेय्क कर्मचाऱ्याला देशी झाडांची रोपे दिली आहेत.