दिनांक :- २७ ऑक्टोम्बर २०२३
सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक स्व. धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे सुपुत्र मा. नगरसेवक विनोद भोसले आणि अमोल भोसले यांच्या वतीने आयोजित बीड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. महादेव महाराज राऊत यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम आमदार प्रणितीताई शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, ह. भ. प. ज्ञानश्वर महाराज चव्हाण, ह. भ. प. सुभाष महाराज शिंदे, ह. भ. प. तुकाराम महाराज देवकते, जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, मराठा मोर्चा समन्वयक माऊली पवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, विश्वनाथ साबळे, अशोक कलशेट्टी, दत्तु बंदपट्टे, अनिल पल्ली, किसन मेकाले गुरुजी, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, समीर शेख, मयूर खरात, अंबादास गुत्तिकोंडा, बसवराज म्हेत्रे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी कीर्तनकार ह. भ. प. महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन, चिंतन ऐकताना उपस्थित सर्व जण तल्लीन झाले होते.
तसेच यावेळी सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष व माजी नगरसेवक स्व. धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथी, धर्मा भोसले सोशल फ़ौउंडेशन द्वारा गरजु रुग्ण आणि नातेवाईक साठी मोफत मार्गदर्शन आणि रुग्णसेवा देण्यासाठी मोफत वैद्यकीय मदत कक्षाचे शुभारंभ आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या कक्ष प्रमुख पदी नामदेव उर्फ बंडू जाधव यांची निवड यावेळी करण्यात आली.
या कीर्तन सोहळ्याच्या वेळी प्रतिपादन करताना ह. भ. प. तुकाराम महाराज देवकते म्हणाले की, जन्मलेला प्रत्येक जीव मरेपर्यंत जगतच असतो म्हणून किती जगला याला महत्त्व नाही तर कसा जगला याला महत्त्व आहे. परोपकारी जीवन हे नेहमीच वंदनीय आहे. प्रत्येक श्वास ही ईश्वराची देणगी आहे त्याचे सार्थक केवळ परोपकारामध्येच आहे. इतरांच्या मनात विश्वास निर्माण करता यावा, प्रत्येकाला मदतीचा हात देता यावा, कुणाच्या जीवनात आनंद भरण्याची संधी मिळाली तर त्यासाठी मागे सरू नये. कुणाच्या सुखात विचारून शामिल व्हा परंतु दुःखात क्षणभर विलंब न करता धाऊन जाणे यातच मानवी जन्माचे सार्थक होईल अश्याच प्रकारचे जीवन जगलेल्या एका गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या गिरणी कामगार म्हणून काम केलेल्या स्व. धर्माजी भोसले परिस्थितीशी दोन हात करत आपल्यासोबत असलेल्या अनेकांचे जीवन आनंदित करण्याचे कार्य केले. समाजात मोठेपणा हा असा गुण आहे जो पदाने अथवा पुस्तकी ज्ञानाने नाही तर कामाने, संस्काराने च प्राप्त होतो तो मान स्व. धर्माजी भोसले यांनी मिळविला. स्व. धर्माजी भोसले यांनी कायम टिकणारी गोष्ट म्हणजे माणूसकी कमावली पैशा पेक्षा जीवाभावाची जीवलग माणसं जोडली. त्यांच्याच वारसा आज त्यांचे सुपुत्र विनोद आणि अमोल चालवित आहेत ही अभिमानाची गोष्ठ आहे.
याप्रसंगी आमदार प्रणितीताई शिंदे म्हणाले की, आजकाल राजकारणात दलबदलू राजकारण सुरु असताना एका गिरणी कामगार ते काँग्रेस कार्यकर्त्यांपासून शहर काँग्रेसचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषवुन अनेक निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी परिश्रम घेतले आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करते.
या कार्यक्रमास भिमाशंकर टेकाळे, पंडित सातपुते, राहुल वर्धा, तिरुपती परकीपंडला, पशुपति माशाळ, प्रवीण जाधव, आरिफ पठाण, सैफन शेख, संजय गायकवाड, रूपेश गायकवाड़, पृथ्वीराज नरोटे, वसिष्ठ सोनकांबळे, सुभाष वाघमारे, म्याकल, श्रीकांत वाडेकर, अमित राठोड, योगेश मार्गम, राजासाब शेख, सुशीलकुमार म्हेत्रे, दाऊद नदाफ, धीरज खंदारे, शाहु सलगर, चंद्रकांत पात्रे, सौरभ सालुंखे, बसु कोळी, आकाश सलगर, आदि उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा. नगरसेवक विनोद भोसले, अमोल भोसले मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.