सोलापूर – ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान,जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. ग्रामस्थांच्या सक्रिय व सातत्यपूर्ण सहभागातून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून दि.११ ऑक्टोबर पासून या अभियानाला सुरुवात झाली आहे.येत्या १५ नोव्हेंबर पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार आहे.हे अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायतीमध्ये राबविण्यात येणार असल्याचे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी दिली.
संपूर्ण ग्रामीण भागातील स्वच्छता शाश्वत टिकण्याच्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन(ग्रा) टप्पा -२ अंतर्गत ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय बांधकाम,सार्वजनिक शौचालय संकुलाचे बांधकाम,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन,गोबरधन,मैला गाळ व्यवस्थापन,प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अश्या प्रकारच्या सर्व कामामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या ग्राम पंचायती,पंचायत समिती व ग्राम सेवक,गट विकास अधिकारी यांना अभियाना अंतर्गत वेगवेगळ्या स्तरावर पुरस्कार देवून गौरवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत सर्वसमावेशक स्पर्धा राबवून त्यामाध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमातील आपलेपणा व महत्व पटवून देण्याकरिता जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.तरी स्वच्छतेच्या या महायज्ञात सर्व ग्राम पंचायती,नागरिक,गाव व तालुकास्तरीय कर्मचारी व अधिकारी तसेच लोक प्रतिनिधीनी सक्रीय सहभागी व्हावे,असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत पुरस्कार
प्रत्येक जिल्हा परिषद गटातील – प्रथम क्रमांक ग्रा.प.स र.रु.६० हजार,जिल्हा स्तरावरील- प्रथम र.रु,६ लक्ष,व्दितीय र.रु.४ लक्ष व तृतीय र.रु.३ लक्ष विभागस्तरीय- प्रथम र.रु,१२ लक्ष,व्दितीय र.रु.९ लक्ष व तृतीय र.रु.७ लक्ष,व राज्यस्तरीय – प्रथम र.रु,५० लक्ष,व्दितीय र.रु.३५ लक्ष व तृतीय र.रु.३० लक्ष
याशिवाय जिल्हा,विभाग व राज्यस्तरावर प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांक वर आलेल्या ग्राम पंचायती वगळून
विशेष पुरस्कार
१.स्व.वसंतराव नाईक पुरस्कार – घनकचरा,सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापन,२. डाँ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार – पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन,३. स्व.आबासाहेब खेडकर पुरस्कार – शौचालय व्यवस्थापन या घटकामध्ये पुरस्कार रोख बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहेत.
गाव,तालुका व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्रक व मानचिन्ह
या स्पर्धेअंतर्गत संबधित वर्षात बांधण्यात आलेली वैयक्तिक शौचालय संख्या,शौचालयाचे रेट्रोफिटिंग,वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान वाटप, घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत कामे संख्या, मैला गाळ व्यवस्थापन अंतर्गत कामे, जिल्ह्यात व तालुक्यात सर्व गावात कचरा विलगीकरण असणे, हागणदारी मुक्त अधिक (ODF Plus) गावांची घोषणा करणे, संपूर्ण जिल्ह्यात व तालुक्यात प्लास्टिक कचरा संकलन/वर्गीकरण व व्यवस्थापन या उपक्रमामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना प्रशस्ती पत्रक व मानचिन्ह देवून राज्यस्तरावरून गौरविण्यात येणार.