• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, January 19, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

करोनाची अ,ब,क,ड साखळी समजून घेणे गरजेची

by Yes News Marathi
March 21, 2020
in मुख्य बातमी
0
करोनाची अ,ब,क,ड साखळी समजून घेणे गरजेची
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 
करोना संसर्ग – जगभर थैमान घालत असताना आपण त्यातील संसर्ग साखळी समजून घेणे खुप गरजेचे आहे. करोनाच्या बाबतीत आपला सर्व समाज चार विभागात विभागाला आहे. यातील वेगवेगळया व्यक्तीकडून नकळत संसर्ग कोणतेही लक्षणं दिसण्याअगोदरच पसरत आहे. म्हणून या चार प्रकारच्या व्यक्तींची ओळख करोना संसर्गाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आपणाला माहित होणे आवश्यक आहे. 
 
???? *अ व्यक्ती* – हा व्यक्ती करोना कोवीड-१९ संसर्ग झालेला आहे. तो विमानाने अथवा अन्य मार्गाने आपल्या परिसरात क ला भेटण्यासाठी आला किंवा कामानिमित्त त्यांच्याकडे आला आहे. 
 
???? *ब व्यक्ती* – अ आणि ब ची ओळख नाही. अ ही व्यक्ती क या व्यक्तीला भेटण्यासाठी जात असताना त्याचा ब या व्यक्तीबरोबर संपर्क झाला. ब ही व्यक्ती विमानतळ, टॅक्सी चालक, ट्रेन मधील, हॉटेलमधील, मॉलमधील, बसस्टॉप, सार्वजनिक शौचालय, सलून, लिफ्ट मधील व्यक्ती, अथवा जाताना येणा-या कोणत्या ना कोणत्या ठिकाणची असू शकते. म्हणजेच ओळख नसताना आपणाला माहित नसताना अ कडून ब ला संसर्ग झाला. ही ब व्यक्तींची संख्या किती असेल हे अ वरती अवलंबून आहे. तो कुठे कुठे फिरला हे शोधणे खुप अवघड आहे.
 
???? *क व्यक्ती* – आता अ ही संसर्ग बाधित व्यक्ती क ला भेटण्यासाठी पोहचली. यामध्ये कुटुंब, मित्र, कॉलेज, शेजारी कोणीतरी किंवा अन्य व्यक्ती असू शकतो. आणि क व्यक्ती आपण सहज शोधू शकतो. कारण अ ला माहिती आहे की तो प्रत्यक्ष कोणाला भेटला आहे.
 
???? *ड व्यक्ती* – ही ती व्यक्ती आहे जी सामान्य आहे. ती अजून अ, ब व क च्या संपर्कात आली नाही. आता आपण या स्टेज मध्ये आहे. जर ड व्यक्ती बाहेर पडून अ, ब किंवा क च्या संपर्कात आली तर संसर्ग अटळ आहे. म्हणून ड व्यक्तीसाठी सर्व प्रशासन लॉक डाऊन करत आहे. तरीही सर्व ड बाहेर पडून संसर्गाला चालना देत आहेत ही खेदाची बाब आहे.
 
आता ही प्रक्रिया समजवून घेणे गरजेचे आहे. या कालावधीत अ या व्यक्तीचा शोध घेणे सोपे आहे. तसेच त्याला काही प्रमाणात लक्षणे असल्याने त्याला लगेच आयसोलेशनमध्ये घेणे शक्य होते. तसेच त्याच्या कडून क व्यक्तींची माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे क व्यक्तींना क्वारंटाईनमध्ये किंवा निरीक्षणाखाली ठेवता येते. यातून संसर्ग साखळी खंडीत करण्यास काही प्रमाणात पण आवश्यक मदत होते. या साखळीतील ब व्यक्ती शोधण्यास अडचण असल्यामुळे ड ही व्यक्ती बाहेर पडून ब च्या संपर्कात आली तर संसर्ग झपाटयाने वाढण्याची शक्यता आहे. हेच चीन आणि इटली मध्ये मोठया प्रमाणात झाले. यामध्ये ब व ड ने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय योजना न अवलंबविल्यामुळे त्यांना संसर्गाला सामोरे जावे लागत आहे. ड च्या संपर्कात ब येण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम, दुकाने, मॉल, जीम, गर्दीत चालणे, पर्यटन अशा सर्वच गर्दीच्या ठिकाणांचा समावेश आहे. म्हणून प्रशासन ब व ड चा संपर्क न येण्यासाठी लॉक डाऊनच्या दिशेने पावले उचलत आहे. त्यासाठी घरातील ड या व्यक्तींनी सहाकार्य करणे गरजेचे आहे. जर ड ही व्यक्ती ब च्या संपर्कात आली तर ती या साखळीतील *ब-२* या नावाने संसर्ग साखळीतील नवीन गटात मोडते. म्हणून ड या व्यक्तीने घरीच थांबून स्वत:ला संसर्गापासून दूर ठेवणे गरजेचे आहे.  
 
आता अ ही व्यक्ती दवाखान्यात आयसोलेशनमध्ये आहे, क ही व्यक्ती क्वारंटाईनमध्ये निरीक्षणाखाली आहे. जर ड ही व्यक्ती घरीच क्वारंटाईन अंतर्गत थांबली तर ब व ब-२ व्यक्तींना शोधणे व त्यांना दोन आडवडयानंतर लक्षणे दिसल्यास उपचारासाठी बोलवणे सोपे होईल. या पध्दतीने लगेच नाही पण काही कालावधीत करोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या साखळीला आपण ब्रेक लावू शकतो. प्रत्येकाने ब-२ संसर्ग बाधीत व्यक्ती न होण्यासाठी गर्दीला टाळले पाहिजे. यामुळे ब या व्यक्तींच्या गटाला शोधणे सोपे होईल, त्यांना उपचार करता येतील व वाढणारा ब-२ गट खंडित होवून करोना संसर्ग आटोक्यात आणता येईल. कारण ब व ब-२ आता खूप घातक आहेत. आपणाला कोणालाच हे ब व ब-२ व्यक्ती माहिती नाहीत एवढेच काय तर त्यांना स्वत:लाही माहित नाही की आपण करोना बाधित आहोत. ड या गटातील व्यक्तींना संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाकडून लोक डाऊन ची पावले उचलली जात आहेत. यामधून जरी 24 तास लोक घरी बसण्यात १०० % यशस्वी झाले तरी ब या व्यक्तीकडून बाहेर पडलेले विषाणू नष्ट होण्यासाठी मदत मिळेल.
 
(सचिन अडसूळ, जिल्हा महिती अधिकारी)
Previous Post

कोरोना-‘डिपीसी’तून ५ टक्के निधी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना

Next Post

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पालक अधिका-यांची नियुक्ती

Next Post
करोनाची अ,ब,क,ड साखळी समजून घेणे गरजेची

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पालक अधिका-यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In