लाखो सोलापूरकरांची तहान भागविणारे उजनी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. अपुरा पाऊस झाल्यामुळे यंदा दुष्काळसदृश्य परिस्थिती उद्भवणार आहे. पाणी वाटप करत असताना प्रथम प्राधान्याने धरणातील पाणी जनतेच्या पाणी पुरवठ्यासाठी राखून ठेवण्याचा नियम आहे. आताच जून अखेरपर्यंत सोलापूर शहराला लागणाऱ्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणाच्या पाणी वाटपाचे नियोजन ठरविणे अत्यावश्यक आहे.
ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी सत्तेच्या जोरावर प्रशासनाला वेठीस धरून बेकायदेशीर पाणी वाटप करण्यासाठी भाग पडतात हा आजवरचा इतिहास आहे. अशाप्रकारे दबावाला बळी पडून पाणी वाटप झाल्यास सोलापूरकरांच्या घशाला ऐन उन्हाळ्यात कोरड पडणार आहे. लाखो सोलापूरकर तहानलेले राहू नयेत याकरिता संभाजी आरमार आताच प्रशासनाला सावध करत आहे. तरी या निवेदनाद्वारे आम्ही प्रशासनास विनंती करत आहोत की, सोलापूरकरांच्या हक्काच्या पिण्याच्या पाण्यावर दरोडा पडणार नाही याची योग्य ती दक्षता घेऊन पाणी वाटपाचे नियोजन करावे.
सोलापूरकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास संभाजी आरमारला सोलापूरकरांच्या न्याय-हक्कासाठी आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल याची कृपया नोंद घेण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे निवेदन देण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, उपशहरप्रमुख रेवणसिद्ध कोळी, राज जगताप, रिक्षा संघटना प्रमुख शोभा घंटे, विभागप्रमुख द्वारकेस बबलादीकर, मल्लिकार्जुन पोतदार, सुधाकर करणकोट, नवनाथ मस्के, सिद्धाराम संगोळगी, समर्थ पवार आदीजण उपस्थित होते.