अकोला : मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनातले चांदणे… आपल्या हातात सत्ता आल्यास आपण नरेंद्र मोदी आणि भागवतांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ते आकोल्यामध्ये माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात आज मुख्य भाषण केलंय. ते अकोला येथे बोलत होते. या भाषणात डॉ. भागवत यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मत घेतले जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भागवतांच्या याच भाषणावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आपल्याला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू असंही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान, रावणदहनाची प्रथा थांबवली जावी असंही आंबेडकर म्हणालेय. यासाठी संघ आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आंबेडकरांनी केलंय.