सोलापूर —सोलापूर महानगरपालिकेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह सोलापूर येथे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग मा.चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेच्या संबंधित विषयांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख, महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे,अतिरिक्त संदीप कारंजे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपयुक्त विद्या पोळ,नगर अभियंता लक्ष्मण चलवादी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सोलापूर शहरातील नियोजित उड्डाणपुलाच्या भूसंपादन, सोमापाच्या रस्त्याच्या प्रलंबित समस्यांबाबत, देगाव येथील मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी एनटीपीसीला देण्याबाबत, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा उजनी धरण 170 एम एल डी संदर्भात, स्व स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव व मार्कंडेय जलतरण तलावामध्ये स्प्रिंग बोर्ड व डायव्हिंग पीट बसवण्याबाबत, जुना पुना नाका ते अरविंद धाम ते सहा कमान ते सुरेगाव कॅम्प पर्यंतच्या रस्त्यामधील रेल्वे क्रॉसिंग RUB चे कामं पूर्ण करणे, अक्कलकोट रोड एमआयडीसी सोलापूर येथे कायमस्वरूपी फायर फायटिंग सेवकांचे निवासस्थान बांधण्याबाबत, दैनंदिन पाणीपुरवठा मध्ये वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठायाकरिता उपाययोजना करणे बाबत, अमृत दोन पाणीपुरवठा योजना, श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व परिसर सुशोभीकरण करणे इत्यादी बाबत चर्चा करण्यात आली.
उड्डाणपुलाच्या भूसंपादन सदर प्रकरणी शासनाचा हिस्सा 101 कोटी पैकी 42 कोटी प्राप्त झाले असून जवळपास 60 कोटी निधी मिळण्याबाबत महानगरपालिकेकडून पाठपुरावा करण्यात आला असून उर्वरित 60 कोटी रक्कम लवकरात मिळावे आयुक्त यांनी मागणी केली. त्याबाबत मा पालकमंत्री यांनी महानगरपालिकेची संबंधित ज्या ज्या निधी हवे आहेत त्यांची यादी तयार करून शासनाकडे पाठवण्यासंदर्भात आदेश दिले. देगाव येथील मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले सांडपाणी एनटीपीसीला देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली हा प्रकल्प महत्त्वाचा असूनNTPC च्या टर्षरी प्रकल्पासाठी महानगरपालिका देगाव एस. टी. बी प्लांट येथे जागा देण्यास तयार आहे परंतु टर्सरी प्लांट एनटीपीसी ने करणे आवश्यक आहे. एस. टी. बी प्लांट मधील प्रक्रिया केलेले पाणी घेऊन एक 72 mld पाईप लाईन चे पाणी शहरासाठी दिल्यास, सोलापूर शहराचा 2050 पर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटेल अशी माहिती आयुक्त यांनी मा पालकमंत्री यांना दिले. यावेळी मा.पालकमंत्री यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याच्या महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव तसेच श्री मार्कंडेय जलतरण तलाव स्प्रिंगबोर्ड व ड्रायव्हिंग पीट बसवण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर पालकमंत्री यांनी सदरचे काम मंजूर करण्यात येईल तसेच विजापूर रोडवरील जलतरण तलावाची पाहणी करून आवश्यक त्या दुरुस्तीची एस्टीमेट करून निधी ची जिल्हा नियोजन समिती कडे मागणी करावी.अक्कलकोट रोड एमआयडीसी सोलापूर येथे कायमस्वरूपी फायटिंग सेवकांचे निवासस्थान बांधण्याबाबत आवश्यकता आहे तसेच या ठिकाणी आणखीन कोणती सुविधा देता येईल याबाबत यादी तयार करावी तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या शासनाकडे प्रलंबित असलेल्या विषयांची यादी शासनाकडे पाठवून देण्यात यावी त्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असे निर्देश दिले.