विविध उपक्रमाने सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करणार
सोलापूर,(प्रतिनिधी):- कस्तुरबा मार्केट परिसरातील दुर्गामाता व्यापारी मंडळ ट्रस्ट यंदा 50 व्या वर्षात पदार्पण करत असून त्या निमित्त यंदाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध उपक्रम साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्ट अध्यक्ष केदार दामा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सन 1974 मध्ये कस्तुरबा मंडई परिसरात शंकरराव मुधोळकर, मल्लिनाथ गिराम, मच्छिंद्र परबळकर, महादेव गोटे, शिवकुमार दामा, भिमाशंकर गळोरगी, पंचप्पा किणगी या प्रतिष्ठित व्यापारी आणि सामाजिक कार्यातील नेत्यांनी दुर्गामाता व्यापारी मंडळ ट्रस्टची स्थापना केली.या ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी दुर्गामातेचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येवू लागला. सुरूवातील लहान मुर्ती त्यानंतर अवघ्या 3 वर्षातच मोठी आणि सुबक मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि त्यावेळेपासून आजपर्यत तब्बल 47 वर्ष एकच मुर्तीची पुजा करण्यात येत आहे. या परिसरातील भाविकांच्या श्रध्देचे स्थान असलेल्या दुर्गामाता मंडळाच्या देवीची पूजा नवरात्रोत्सवासोबत वर्षभरात भक्तीभावाने केली जाते. यंदाच्या वर्षी मंडळ 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आलेले आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवात नऊ दिवस विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत ते पुढीलप्रमाणे –
या नवत्रोत्सवाची आणि सुवर्ण महोत्सवी वर्षाची सुरूवात रक्तदान शिबीराने करण्यात आली या शिबीरात दोन तरूणीने हिरहिरीने सहभाग घेवून खऱ्या अर्थाने नवरात्रोत्सव साजरा केला. दि. 15 ऑ्नटोंबर रोजी भव्य लेझिमच्या ताफ्याने मिरवणुक काढून मुर्तीची प्रतिष्ठापना करून घटस्थापना होणार आहे. दि. 16 रोजी नक्षत्र आरती करून महापुजेस प्रारंभ करण्यात येणार आहे.
दि.17 रोजी सायंकाळी 7 वा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सुप्रसिध्द शिव व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांचे चला संस्कार घडवू या या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण डेहराडून येथील तपकेश्वर महादेवाचे गुफा असा देखावा करण्यात येणार आहे. त्याचे उदघाटन दि.18 रोजी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दि.19 रोजी सायंकाळी 4 ते 6 यावेळेत कुंकुमार्चना होणार आहे. दि. 20 रोजी कुमारीका पूजन, दि. 21 रोजी श्रीसुक्तपठण आणि रविवार दि. 22 रोजी पहाटे 6 ते 8 या वेळेत होमहवन तर सायंकाळी 6 वा.दिपोत्सव होणार आहे. दि. 23 रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवार दि.24 रोजी वियादशमी दिवशी भव्य मिरवणुक मध्यवर्ती मार्गावरून निघणार असून या मिरवणुकी शिवकालीन पारंपारिक वाद्ये सामिल करून वाजवण्यात येणार आहेत. सिमोल्लंघनने मिरवणुकीची सांगता करण्यात येणार आहे.
दरवर्षी मंडळाच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा काळात नंदिध्वज महापूजा करून महाप्रसादाचे वाटप करण्यात येते अशा प्रकारे वर्षभर मंडळाच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते यंदाचे हे 50 वे वर्ष असून विविध उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे. असेही दामा यांनी सांगितले. हे सर्व उपक्रम ट्रस्ट पदाधिकारी – अध्यक्ष केदार दामा, उपाध्यक्ष रमेश सट्टे, खजिनदार जालिंदर परबळकर,सचिव सिध्दाराम बोराळे, सोमशेखर तेल्लूर, भारत कुंभार, मल्लिकार्जुन खानापुरे, दिपक गुमटे, मल्लिनाथ गिराम, विजयकुमार कोकणे, नामदेव मुधोळकर. उत्सव पदाधिकारी – श्रेयक गावसाने, उपाध्यक्ष धनंजय सोनसळे, सचिव सुनिल परबळकर, खजिनदार गजानन गळुरगी, दिपक भैरप्पा, सिध्देश्वर किणगी, विरेंद्र हिंगमिरे, कल्याणी किणगी, सुदेशकुमार तापडीया, दत्ता वाघमोडे, आनंद ढेपे, चंद्रकांत झाडबुके, अक्षय परबळकर, निलेश सट्टे, विरेंद्र शिंदे यांच्या प्रयत्नातून करण्यात येतात.