भारतीय राष्ट्रीय महामार्गाच्या सुरत चेन्नई या ग्रीन कॉरिडोर कडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी- दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट मार्गे हा ग्रीन कॉरिडोर कर्नाटकाकडे जातो.1220 किलोमीटर लांबीचा हा रस्ता 45 हजार कोटी रुपयांचा आहे. यामध्ये सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर 513 किलोमीटर तर सोलापूर कुर्नुल चेन्नई सातशे किलोमीटर लांबीचा रस्ता असणार आहे. या महामार्गाची सोलापुरात भूसंपादन कारवाई गतीने सुरू आहे. सोलापुरात 150 किलोमीटरचा हा ग्रीन कॉरिडोर असणार आहे. एकूण पाच टप्प्यामध्ये काम होणार असून पॅकेज क्रमांक 14 चे 36 किलोमीटर लांबीचे 1700 कोटी रुपयांचे अक्कलकोट मधील हासापूर ते कर्नाटक बॉर्डर पर्यंतचे टेंडर भारतीय राष्ट्रीय महामार्ग विभागाने प्रसिद्ध केले आहे. या महत्त्वकांक्षी प्रकल्पाकडे विविध राज्यांचे आणि जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे