सोलापूर शहराच्या प्रवेशदारावर पडलेले भले मोठे आणि जीवघेणे खड्डे सोलापूर महापालिकेच्या कृपेने बुजवले जाऊ लागले आहेत. वास्तविक पाहता हा राष्ट्रीय महामार्ग आहे मात्र महापालिका आणि महामार्ग विभाग यांच्या वादात रस्ता कोणी करायचा यावर तोडगा निघत नव्हता. शेवटी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी 2 कोटी 43 लाख रुपये खर्चून छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा हा दुतर्फा रस्ता नव्याने करण्याचा निर्णय घेतला आहे. याची टेंडर काढण्यात आले असून 25 ऑक्टोबर पर्यंत टेंडर भरण्याची मुदत आहे तत्पूर्वी या मार्गावर पडलेले भले मोठे खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे खूप मोठा खड्डा पडला होता. शुक्रवारी सायंकाळी संभाजी महाराज पुतळा परिसरातील खड्डे बुजवण्यात आले. मोठी खडी तसेच लहान खडी आणि डांबराने हा रस्ता पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले आहे. उद्यापर्यंत या महामार्गावरील नवी वेस पर्यंतचा रस्ता नीट केला जाणार असून त्यानंतर प्रीमिक्सच्या सहाय्याने तो आणखी चांगला केला जाणार आहे. नव्याने रस्ता होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी जाणार असल्यामुळे खड्डे दुरुस्ती मुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या रस्त्या संदर्भात वारंवार येस न्यूज मराठीने पाठपुरावा केला