मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शाहरुख खानला सरकारने Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. शाहरुख खानला याआधी दोन पोलीस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे.
शाहरुख खान कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यावेळी त्याच्या सुपक्षेखाली प्रशिक्षित कमांडो तसेच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन असेल. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनामुळे शाहरुखच्या गाडीसमोर कोणीलाही येता येणार नाही. वाहतूक सुरळीत करण्यास हे वाहन मदत करेल. शाहरुख आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खानलादेखील Y+ सुरक्षा पुरवण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता सलमाननंतर शाहरुखलादेखील Y+ स्कॉट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.