येस न्युज नेटवर्क : अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप झाला असून जमीन हादरली आहे. अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलचा भूकंपआला आहे. या विनाशकारी भूकंपामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 2,000 च्या पुढे गेली आहे.
विनाशकारी भूकंपात 2000 जणांचा मृत्यू
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये शनिवारी भीषण भूकंप झाला आहे. 6.3 रिश्टर स्केट तीव्रतेचा भूकंपानंतर जोरदार झटके बसल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे. तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 2,000 च्या पुढे गेली आहे.