सोलापूर : राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प अंतर्गत राबविण्यात आलेले विशेष प्रशिक्षण केंद्र क्रमांक 16 महाराणा प्रताप कुमठा नाका सोलापूर येथे सामाजिक वनीकरण विभाग सोलापूर आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने नैसर्गिक रंग तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी कार्यशाळांमध्ये सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी संजय तानाजी भोईटे यांनी आम्हाला आपल्या घरातील उपलब्ध असलेल्या साधनसामग्री साह्याने आपण रंग तयार करू शकतो उदाहरणार्थ फुलझाडांच्या आणि झाड पत्त्याच्या अविष्कारातून तयार केलेले हे रंग पूर्णपणे नैसर्गिक रंग असून याला खऱ्या अर्थाने हर्बल किंवा नैसर्गिक रंगपंचमी म्हणायला हरकत नाही असे रंग वापरून शरीराला कोणताही त्रास होणार नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव या माध्यमातून होणार नाही. तसेच हळद बीट मेंदीच्या झाडा च्या पाल्यापासून गुलाबाच्या पानापासून पालक भाजी पासून इत्यादी पासून सुका कलर व ओला कलर तयार करू शकतो.अष्टगंध गुलाल कुंकू यांचाही विविध रंगासाठी कोरडा आणि ओला रंग म्हणून वापर करू शकतो सदरचा कार्यक्रम अपर्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या सदर कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी केंद्रातील सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पोतदार तसेच शिक्षिका वहिदा मुजावर,गीता धूमाळ, सेविका अंजना शिवसिंगवाले यांनी परिश्रम घेतले.