सोलापूर : सो.स.क्षत्रिय समाज(विठ्ठल मंदिर) ट्रस्ट संचलित सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर आयोजित जागतिक महिला दिन व कै.पार्वतीबाई भूमकर यांच्या 20 पुण्यस्मरण दिनानिमित्तसहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिर येथे भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन महापौर श्रीकांचनाताई यन्नम यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर श्रीकांचनाताई यन्नम व कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर विद्यापीठचे सिनेट सदस्य आश्विनी चव्हाण आणि मान्यवरांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आले.यावेळी चंद्रिका चव्हाण,नगरसेविका राजेश्री कणके,निर्मला तांबे,ट्रस्टचे अध्यक्ष गणपतसा मिरजकर, शालेय समितीचे अध्यक्ष गुलाबचंद बारड,मुख्याध्यापिका मंजुषा काशीद,मुख्याध्यापक भगवंत उमदीकर आदी मान्यवर उपस्थित होते.