सोलापूर — स्मार्ट सिटी मिशनच्या वतीने इंडिया स्मार्ट सिटी अवॉर्ड कॉक्लेव्ह 2023 चे आयोजन 26-27 सप्टेंबर 2023 रोजी इंदोर येथे आयोजित करण्यात आले होते.27 सप्टेंबर 2023 रोजी मा राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शहरांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
या अंतर्गत भारताच्या पश्चिम विभागीय मध्ये सोलापूर यांच्या 2022 च्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा.राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते सोलापूर महापालिकेचे आयुक्त शीतल तेली- उगले यांना पारितोषिक देण्यात आले. यावेळी मध्य प्रदेशचे राज्यपाल श्री मंगूभाई पटेल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी तसेच स्मार्ट सिटी चे कुणाल कुमार आदी मान्यवर उपस्थित होते.पश्चिम विभागातील उल्लेखनीय कामगिरीसाठी सोलापूर शहर व अहमदाबाद स्मार्ट सिटी दहा लाखाहून अधिक लोकसंख्येच्या शहरांसाठी पारितोषिक घोषित झाले होते.
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत सोलापूर शहरामध्ये पाणी नियोजनासाठी स्काडा प्रणाली, इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक जागांचा विकास, सौर ऊर्जा प्रकल्प, रस्ते विकास, पाण्याच्या पाईपलाईन, सोमपा इंद्रभवन इमारत आणि लक्ष्मी मंडई येथील इमारत अशा पुरातन वास्तूंचे पुनरुज्जीवन करणे इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात आले. असे उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे भारताच्या पश्चिम विभागात सोलापूर शहराला आज पारितोषिक देण्यात आले. यावेळी उप अभियंता वेंकटेश चौबे, स्मार्ट सिटी चे मनीष कुलकर्णी, मनोज नंदीमठ, इंजिनीयर उमर बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.