आज न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वडाळा येथे शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी वडाळा गावचे विद्यमान सरपंच व संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.जितेंद्र बाबा साठे,प्रशालेच्या प्राचार्या/ मुख्याध्यापिका डॉ. वैशालीताई साठे मॅडम, पर्यवेक्षक पोतदार सर,मा.मोकाशी सर वडाळा गावचे माजी.सरपंच बाळासाहेब सुतार व संस्थेच्या संकुलातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन श्री.बाळासाहेब सुतार यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रदर्शनामध्ये प्राथमिक गट,माध्यमिक गट, व उच्च माध्यमिक गट असे गट तयार करण्यात आले.हे सर्व वैज्ञानिक प्रयोग संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बाबा साठे, प्रशालेच्या प्राचार्या/ मुख्याध्यापिका डॉ.वैशालीताई साठे मॅडम, सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांनी पाहून सर्व प्रयोगकर्ते विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व आभिनंदन केले.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 80 प्रयोग मांडण्यात आले, यांना मार्गदर्शक म्हणून प्रशालेचे विज्ञान शिक्षक रावळे सर ,उंदरे मॅडम,गुंड सर,वाघमारे सर, नाईकनवरे सर व सोलंकर सर हे लाभले. विज्ञान प्रयोग परीक्षक म्हणून जी. बी.घोडके विद्यालय नान्नज येथील विज्ञान शिक्षक निचळ सर व घोडके सर तसेच ब्रम्हागायात्री रानमसले प्रशालेचे विज्ञान शिक्षक व सवने सर लाभले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी काकानगर जिल्हा परिषद शाळा व गावातील जिल्हापरिषद शाळांनी भेट दिली व प्रशालेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी विज्ञान प्रदर्शनाचा आनंद घेतला.