आस्था फाऊंडेशन संचलीत आस्था रोटी बँकेतर्फे आज कृष्ण जन्माष्टमीनिमित्य दमाणी नगर येथील स्वातंत्र्य काळापुर्वीपासुनच्या रोटरी मुक बधीर शाळेतील विदयार्थींना सोबत साजरा करताना एक वेगळा आनंद वाटतोय जो शब्दांत नाही व्यक्त करता येणार
प्रथम या दिव्यांगाना आजच्या दिवस महत्त्व छोट्या श्या गोष्टीतुन सांगण्यात आल जस द्वापर युगात भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्ण चा होता
पृथ्वीवरील राक्षसांचे अराजक्त व धरणी मातेच्या उध्दारासाठी स्वतः भगवान श्रीहरी विष्णूंनी देवकीच्या पोटी जन्म घेतला व यशोदेच्या छत्राखाली मोठे झाले
हया दरम्यान अनेक लीला रचल्या गेल्या
जन्मतः च गंगेचा पुर हिङिंमा बध कालिया नर्तन गोर्वधन पर्वत पुजा रास लीला तसेच एक श्रीकृष्णची लीला दहीहांडी फोडणे. जिथे मथुरेत भगवान श्रीकृष्णच संगोपन होत होते तर दुसरीकडे त्यांचेच मामा कंस चा प्रेजेवर अतोनात कर अत्याचार इतकच काय तर दिवसभर गोमातेचे पुर्ण काळजी घेऊन सेवा करुनही एक ही थेंब दुधाचा लहानांसाठी दुध लोणी तुप खाण्यास वाससही मिळत नव्हते तिथे अश्या गुराख्यांच्या गरीब मुलांना सकस अन्न मिळावे म्हणून त्यांच्या वाढीसाठी दुध दुधपते पदार्थ महत्त्वाचे त्यामुळेच दहीहांडी ची प्रथा पडली.
वेगवेगळ्या धर्माच्या या गरीब मुलांना बरोबर लोणी असलेल्यां घरातुन उंचीप्रमाणे थर उभारुन सर्व प्रथम आपण चखुन तो प्रसाद गरीब मित्राला देणारे भगवान श्रीकृष्णच तात्पर्य काय तर दानाच महत्त्वाचे आज नाही तर प्राचीन काळापासुन चालत आलय फक्त आज स्वरुप बदलले आज इथ कोणत देव रुपात नाही तर माणसाच्या रुपात तुमच्या आमच्या रुपात आहे फक्त ओळखायला ती नजर हवी.
जस की आस्था फौऊंडेशनचे रोजच काम आहे अन्नदान च रोज 200/300 गरीब गरजु आज्जी आजोबांना गरजु पिडित कुटुंबांना केल जात आहे त्याचबरोबर येणारा प्रत्येक मोठा सण थोरपुरुषांच्या जयंती निमित्ताने शालीय साहित्य शालीयपयोगी वस्तू निराधर ज्येष्ठांना धार्मिक ठिकाणी देवदर्शनाची सोय हया कारणांमुळे तर चर्चेत असतोच पण आज अजूनही नवा उपक्रमात सहभाग नोंदवून समाजापुढ अजुन एक उदाहरण दिलेय.
आज कृष्णजन्माष्टमी निमित्ताने दमाणी नगर येथील जवळजवळ मुक बधीर दिव्यांग शाळेचे शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल असलेल्या रोटरी मुक बधीर शाळेच्या विदयार्थ्यांसोबत राधा कृष्ण पोषाखात दहीहांडी साजवट ,रांगोळी नृत्य भले त्यांना देवाने ऐकण्याची वा बोलण्याची शक्ती नाही दिली पण एक सहाव ज्ञानेंद्र दिलय माणुसकीच आत्मीयतय च विदयार्थ्यांना पण मनोसोक्त नृत्य फेर धरून राधाकृष्णांसोबत रासलीला चा एक लुक दिसत होता तर दहीहांडी फोडताना त्यांच्या उत्साह इतका की एखाद्या सदृढ मुलाल लाजवतील असा. दहीहांडी नंतर प्रसाद म्हणून खाऊ वाटपाने संगता झाली.दरम्यान आस्था फाऊंडेशन च्या या उपक्रमात सहभाग दिला नीलिमा हिरेमठ, कांचन हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संगिता छंचुरे ,मंगल पांढरे ,अनिता तालीकोटी , गीता भोसले ,अंजली गुरव ,श्रध्दा अध्यापक ,स्मिता आयवळे,विदया दायमा ,स्वामी चराटे मॕडम ,नीता गंगणे ,पुष्कर पुकाळे तर कार्यक्रमासाठी नियोजन व व्यवस्थापन केलय विजय छंचुरे व सौ.छाया गंगणे जाधव यांनी तर आम्हांला आजची गोकुळष्टमी साजरी करण्यासाठी मोलाच योगदान दिलं ते शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितीजा गाथाडे व शिक्षक व कर्मचारी वृंदा यांनी. तरी यावेळी मंगला पांढरे ,अंजली गुरव ,स्वामी चराटे मॕडम व सौ.छाया गंगणे जाधव यांनी मनोगत व्यक्त केल.