सोलापूर महानगरपालिका अंतर्गत “स्वच्छ सर्वेक्षण”, “माझी वसुंधरा अभियान” व “राष्ट्रीय स्वच्छ वायु उपक्रम” ची प्रभावी अंमलबजावणी करणेत येत असुन शहरातील नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीवजागृती करणेकामी मा. शासन स्तरावरून दि.०४ जुलै २०२३ रोजीचा शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव २०२३ पर्यावरणपुरक पद्धतीने साजरा करावा याकरिता स्पर्धांचे आयोजन केले आहे.
सदर शासन निर्णयाला जास्तीत जास्त प्रसिद्धी देणेकामी सोलापूर शहरातील नागरिकांमध्ये सामाजिक व पर्यावरण संवर्धन विषयक जनजागृती होणे कामी सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील गणेश मंडळासाठी “पर्यावरणपुरक गणेशोत्सव २०२३” स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असुन सदर स्पर्धेमध्ये खालील उपक्रम राबवावयाचे आहेत.
-:प्रस्तावित उपक्रमाची रुपरेषा व गुणांकन:-
अ.क्र. गुणांकनासाठी बाब गुणांक
१. पर्यावरणपुरक मूर्ती १०
२. पर्यावरणपुरक सजावट (थर्माकोल/प्लॅस्टीक रहीत) १५
३. ध्वनीप्रदुषण व वायुप्रदूषण रहित वातावरण ०५
४.
पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंर्धश्रद्धा निर्मुलन, इ.समाज प्रबोधन / सामाजिक सलोखा संदर्भात सजावट/देखावा किंवा
२५
स्वांतत्र्याच्या चळवळी संदर्भात /छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट/देखावा
५. गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबीर, वर्षभर गडकिल्ले सवंर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौरउर्जाबद्दल जागरुकता निर्माण करणे, अॅम्बुलन्स चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे इ. सामाजिक कार्य (अनु. क्र. ६ व ७ व्यतिरिक्त )
२०
६. शाळकरी व महाविद्यालयीन विद्याथी/ विद्यार्थिनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, इत्यादीबाबत केलेले कार्य
१५
७. महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक/आरोग्य/ सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य
१५
८. पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम/स्पर्धा १०
९. पारंपारिक/ देशी खेळांच्या स्पर्धा १०
१०. गणेश भक्तांसाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा उदा. पाणी/प्रसाधनगृह, वैद्यकीय प्रथमोपचार, वाहतुकीस अडथळा येणार नाही असे आयोजन, आयोजनातील शिस्त, परिसरातील स्वच्छता (प्रत्येक सुविधेस ५ गुण)
२५
एकूण १५०
वरीलप्रमाणे विविध माध्यमातुन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडुन करण्यात येणा-या कार्यवाही बाबत संपुर्ण माहिती व त्याचबरोबर जागा कार्यक्रम अथवा कामाची जागा काम करतेवेळी व काम पूर्णझाल्यावर Geo Tag Photo काढणे बंधनकारक आहे. तसेच सदर स्पर्धा कालावधीत करणेत आलेल्या कामांचा लेखी अहवाल नियंत्रण कक्ष (पर्यावरण विभाग, सो.म.पा. ) येथे विहीत कालावधीत सादर करावा.
• या स्पर्धेसाठी नियंत्रण यंत्रणा अंतर्गत उपायुक्त -१, सहा.आयुक्त, उद्यान अधीक्षक, मुख्य सफाई अधीक्षक, कामगार कल्याण अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापक (युसीडी) पर्यावरण व्यवस्थापक इ. राहतील.
वरील स्पर्धेच्या माध्यमातून तीन अंतिम विजेते निश्चित करण्यात येतील त्यांना पारितोषिक स्वरुपात रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरवान्वित केले जाईल.
स्पर्धेतील बक्षिसे खालील प्रमाणे :
अ.क्र.
गुनानुक्रमांक
बक्षिसे
१ प्रथम २.०० लाख
२ द्वितीय १.५० लाख
३ तृतीय १.०० लाख
सदरची स्पर्धा ही दि.०५/०९/२०२३ पासुन दि.३०/०९/२०२३ अखेर घेण्यात येणार असून सदर स्पर्धेत सहभाग लेखी स्वरूपात नोंदविण्याकरिता दि.२०/०९/२०२३ सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत पर्यावरण विभाग, सो.म.पा. यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच संबंधित गणेश मंडळांनी मा शासनाचे सन २०२३ मधील स्पर्धेमध्ये ([email protected]) सहभाग नोंदविणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेचे सर्व अधिकार हे मा.आयुक्त सो.म.पा. यांचेकडे राखीव ठेवण्यात येत आहेत.