सोलापूर, (प्रतिनिधी):- जुळे सोलापूर अंबर हॉटेल समोरील मोकळी जागा खरेदी न देता 35 लाख रूपये घेवून हुंबरवाडीसह दोघांनी मिळून एका आर्किटे्नचरला फसवले. ही घटना दि. 13 ऑ्नटोंबर 2016 रोजी घडली.
सुहास गुरप्पा हुंबरवाडी (वय 54, रा. बी1/ 702, बिल्डींग नं.ए 3, फ्लॅट नं. 203 सुवर्णरत्न गार्डन्स सहकारी रचना, कर्वे रोड, पुणे ), स्वप्नील मोहन घोरपडे (वय 40, रा. राममंदीर समोर, अंबिका स्टोअर्सच्या बाजूला, लष्कर, सोलापूर) असे दोघा आरोपींची नावे आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी की, आरोपींनी त्यांच्या मालकीची जुळे सोलापूर येथील अंबर हॉटेलच्या समोर असलेली मोकळी जागा 130/7 या मिळकतीमधील 313.47 चौरसमिटर इतका प्लॉट नं. 19 हा आर्किटे्नचर व्यावसाय करणारे फिर्यादी केदार राजशेखर बिराजदार (वय 47, रा. 26, रेल्वेलाईन्स, फ्लॅट नं. 14, श्रध्दा एम्पायर सोलापूर) यांना पसंद पडली त्यामुळे आरोपींशी बोलणी करून ती जागा 40 लाख 46 हजार 500 रूपयाला व्यवहार ठरला 20 लाख रूपये देवून खरेदी नंतर उर्वरीत देण्याचे ठरले त्यानुसार दि. 13 ऑ्नटोंबर 2016 रोजी 15 लाख रूपये आणि दि. 16 डिसेंबर 2016 रोजी आरटीजीएस ने 20 लाख रूपये असे एकूण 35 लाख रूपये आरोपींना देण्यात आले. परंतु जागा खरेदी न देता पैसे परत देतो म्हणून न वटणारे चेक देवून फसवणुक केली अशी फिर्याद केदार बिराजदार यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलीसांनी सुहास हुंबरवाडी आणि स्वप्नील घोरपडे या दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.