सोलापूर : श्री मलकारसिद्ध हायस्कूल ,हालचिंचोळी ता.अक्कलकोट जि.सोलापूर प्रशालेत इ.१० वी विध्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सिद्धाराम काळे (७ निवृत्त मुख्याध्यापक ) व प्रमुख पाहुणे म्हणून भिमाबाई बनसोडे (सरपंच), सुभाष नागरसे, विश्वनाथ कल्याणशेट्टी तसेच याप्रसंगी संस्थेचे संस्थापक म्हाळप्पा सुरवसे साहेब, महमद करनाचे, इंदलबेग मिर्झा, सोपान लवटे,सदाशिव सोनवणे, सतीश बनसोडे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक व्यंकटेश बोकडे सहशिक्षक संतोष बिराजदार, गुंडेराव मोरे, राजू राठोड, शिवानंद पुजारी, प्रकाश सुरवसे, शहाजान मिर्झा, रवी जमादार, काशिनाथ गोतसुर्वे, सिद्धाराम कांबळे, राजकुमार कांबळे,श्री अमसिद्ध पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी विध्यार्थी,शिक्षक,प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी अध्यक्षीय समारोप सिद्धराम काळे यांनी “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या समारोपात पुढे म्हणाले की “ध्येयवादी बनून कष्ट करा म्हणजे यशस्वी व्हाल” असे गुरुमंत्र विद्यार्थ्यांना दिले.यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी इ.१० वी विध्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देऊन परीक्षे संबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निकिता मणुरे तर आभार प्रदर्शन कु.नाजुकबी करनाचे हिने केली.