सोलापूर : श्री सद्गुरू शिवानंद स्वामी महाराज यांच्या समाधी सोहळ्या निमित्त मंगळवारी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांचे कीतर्न संपन्न झाले.यावेळी आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या प्रदेशाध्यक्ष पदी ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांची निवड झाल्या बद्दल श्री सद्गुरू शिवानंद स्वामी ट्र्स्ट व उद्योजक समीर लोंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच ह.भ.प. अनंत महाराज इंगळे, आखिल भारतीय वारकरी मंडळाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी ह.भ.प .ज्योतीराम महाराज चांगभले,सोलापूर शहराध्यक्ष पदी ह.भ.प.संजय महाराज पवार यांची निवड झल्याबद्दल श्री सद्गुरू शिवानंद स्वामी ट्र्स्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शंकरानंद स्वामी महाराज, ह.भ.प. गोविंद महाराज माने,ह.भ.प.बजरंग महाराज डांगे,कुमार गायकवाड,उमेश कणसे,दिनेश भोसले,विलास जाधव,माऊली जरग,कमलेश सातपुते,दत्तात्रय कांबळे,अरविंद कलाल,तसेच वारकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.