मोडनिंब : पतसंस्थेच्या कारभारात राजकारण न आणता ज्याची परत कर्जफेड करण्याची क्षमता आहे अशा लोकांसह कर्ज उचलून प्रामाणिकपणे परत कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या खातेदारालाच कर्ज वाटप करावे त्याचबरोबर बँकेच्या संचालकांनी कर्ज घेऊ नये तरच बँक व्यवस्थित चालते ” असे रोखठोक प्रतिपादन महात्मा फुले आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी केले.मोडनिंब येथील लक्ष्मी विलास अर्बन लिमिटेडच्या मुख्य शाखेच्या उदघाटनपूरसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी शिवसेनेचे अरविंद पवार होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की ” मी महात्मा फुले विकास महामंडळाचा अध्यक्ष झाल्यानंतर गरजू लोकांना कर्ज वाटपासाठी मंडळाकडे पैसे नव्हते मा.आठवलेसाहेब व माजी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या सहकार्याने चारशे कोटी कायमस्वरुपी ठेवीतील एकशे तेहतीस कोठी रुपये वाटून युवकांना व समाजातील गरजूंना कर्ज देऊन व्यवसाय उभारणीसाठी मदत केली .अन् त्याच कर्जाची नियमितपणे कर्जदार परतफेड करत असल्याचे सांगितले. सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. संचालक मंडळातील राजाभाऊ कोळी संजय जाधव धनाजी कांबळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाप्रसंगी रिपाईचे कुमार वाघमारे सोलापूर शहरअध्यक्ष जितेन्द्र बनसोडे शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष वैभव मोरे बहुजन सत्यशोधक संघाचे सुनिल ओहोळ माढा तालुका राष्ट्रवादीचे कैलास तोडकरी टैंभुर्णी चे परमेश्वर खरात यासह कोल्हापूर माढा उस्मानाबाद आदि भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.