झुलवा पाळणा, पाळणा बाळ शिवाजीचा..चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा..
आज उगवला सूर्य नभी नव्या नवलाईचा… झुलवा पाळणा, पाळणा बाळ शिवाजीचा..
सोलापुर : असे गीत गट सोलापुरात मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता सुमारे १० हजार जिजाऊंनी आणि मावळ्यांनी शिवबाचा पाळणा गायला. या अभूतपूर्व सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. हा सोहळा याची डोळा याची देही पाहत अनेक मावळ्यांनी हा भरवलेला क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपला. मध्यरात्री ठीक १२ वाजता वीरमाता, वीरपत्नी, वीरकन्यांच्या हस्ते पाळणा झुलवत आणि हजारो जिजाऊंनी पाळणा म्हणत स्फूर्ती निर्माण केली. हा कर्यक्रम पार पाडण्यासाठी सुमारे ५०० पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगले नियोजन केले होते त्यामुळे मंगळवारी रात्री १० वाजल्यापासुन ते मध्यरात्री २ वाजेपर्यंत शिवाजी चौक शिवभक्तांनी गजबजून गेला होता. पहा हा भारावलेला अत्यंत देखणा शिवबांचा पाळणा..