सोलापूर: सोलापूरचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची शासनाने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती केली होती मात्र त्यांनी ही नियुक्ती रद्द करून घेतले असून त्यांची आता पुणे येथे अतिरिक्त विभागीय आयुक्त या पदावर नियुक्ती झाली आहे राज्य शासनाने चार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या केल्या यामध्ये राजेंद्र भोसले यांच्यासह चौघांचा समावेश आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी तथा सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डठोंबरे यांची शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना आता नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद देण्यात आली आहे. तर अभिजित बांगर यांची नागपूर येथे वस्ताद मंडळाच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.