- घर, गाडी घेण्यासाठी जागेवर कर्ज मंजुर करणार
सोलापूर, (प्रतिनिधी):- सर्व सामान्यांचे स्वत:चे घर आणि स्वत:ची गाडी असावी हे स्वप्न साकार करण्यासाठी बॅक ऑफ इंडिया सोलापूर विभागाच्या वतीने प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोचे आयोजन दि. 15 आणि 16 फेब्रुवारी या दोन दिवशी नार्थ कोट मैदानावर करण्यात आल्याची माहिती सोलापूर विभागाचे महाप्रबंधक अजय कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सोलापूर विभागाचे उपमहाप्रबधंक शैलेषचंद्र ओझा उपस्थित होते.
प्रत्येक भारतवासियांला स्वत:चे हक्काचे घर मिळावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना सुरू केली त्या योजनेला प्रोत्साहन मिळावे आणि प्रत्येक सर्वसामान्यांला घर आणि घरजागा मिळावी यासाठी बॅक ऑफ इंडियाच्या वतीने प्रॉपर्टी ए्नस्पोचे आयोजन केले आहे. प्रॉपर्टी सोबतच विविध चार चाकी आणि दुचाकी वाहनांचेही या ए्नस्पोमध्ये समावेश आहे. सोलापूर शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचा ए्नस्पो होत आहे. सोलापूर शहर जिल्हा तसेच महाराष्ट्रातील नामांकित बिल्डर आणि वाहन विक्रेते या ए्नस्पो मध्ये सहभागी होत आहेत. बीएमडब्लू, स्कोडा, फोर्ड, हुंडाई, रेनॉल्ट, मारूती सुझुकी, महिंद्रा, रॉयल इनफिल्ड, अशा विविध ऑटो कंपन्यांचे डिलर आपले वाहन या ए्नस्पो मध्ये प्रदर्शनासाठी ठेवणार आहेत. सोलापूरकरांना ही सुवर्णसंधी आहे. घर, घर जागा आणि वाहन हे एकाच ठिकाणी पाहण्यास आणि खरेदी करण्यास उपलब्ध आहेत. घर, घरजागा आणि वाहन खरेदी करण्यासाठी अर्थ पुरवण्याची जबाबदारी बॅक ऑफ इंडियाने घेतली आहे. ज्यांना आवश्यक आहे त्यांना जागेवरच कर्ज मंजुर करण्यात येणार आहे असेही महाप्रबंधक अजय कडू यांनी सांगितले.
गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांना या ए्नस्पोमध्ये कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग फि आकारले जाणार नाही. जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ घेता यावा म्हणून बॅक ऑफ इंडियाने पुढाकार घेवून प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोचे आयोजन केले आहे.
शनिवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी नार्थ कोट मैदानावर या प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोचे उद्घाटन बॅक ऑफ इंडियाचे महाप्रबंधक रमेशचंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे त्यानंतर 15 व 16 फेब्रुवारी या दोन दिवस चालणाऱ्या प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोमध्ये बॅकींग क्षेत्रातील तज्ञांकडून गृहकर्ज, वाहनकर्ज या विविध विषयावर सेमिनार होणार आहे. या सेमिनारमध्ये सोलापूरकरांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे तसेच या दोन दिवसाच्या प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोला भेट देणाऱ्या नागरीकांना बॅक ऑफ इंडियाच्या वतीने आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. नामांकित बिल्डर आणि डेव्हलपर्स तसेच आकर्षक नामांकित कंपन्यांचे वाहने एकत्रीत पाहण्याची अनुभवण्याची संधी सोलापूरकरांना मिळत आहे. सोलापूरमध्ये प्रथमच होत असलेल्या बॅक ऑफ इंडियाच्या प्रॉपर्टी आणि ऑटो ए्नस्पोला सोलापूरकरांनी भेट देवून घर आणि गाडी खरेदी करण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मार्केटींग व्यवस्थापक सचिनकुमार आणि घनशाम गुलेचा यांनी केले.