येस न्युज मराठी नेटवर्क :दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 50 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे.