सोलापूर : सोलापुरातील स्मृतिवनामध्ये लपणगृहाचे उदघाटन प्रसिद्ध पक्षीमित्र बी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते उपवन संरक्षक प्रवीण कुमार बडगे, विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, मानद वन्यजीव रक्षक निनाद शहा आणि निसर्गप्रेमी डॉ. व्यंकटेश मेतन यांच्या उपस्थितीत पार पडले.
उदघाटनानंतरच्या कार्यक्रमात सुवर्णा माने यांनी या लपणग्रहाबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. ह्या लपणगृहाची संकल्पना डॉ. व्यंकटेश मेतन यांनी सुचविली आणि त्यांनी दिलेला प्रस्ताव शासनाद्वारे मंजूर करून घेण्यात आला. या लपंडावाचा उद्देश प्रत्येक पक्षीप्रेमीसाठी पक्ष्यांचा जवळून अभ्यास करता यावा तसेच पक्षांचे छायाचित्र काढणाऱ्या व्यक्तींना चांगल्या दर्जाचे छायाचित्र काढता यावेत असा आहे. हे करीत असताना पक्ष्याने कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, हा उपक्रम सोलापुरातील सर्व पक्षीप्रेमी आणि पक्ष्यांची छायाचित्र काढणारे व्यक्तींसाठी एक मेजवानी ठरणार आहे, या लपणगृहाचा फायदा सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी या प्रकल्पासाठी परिश्रम केले असे मत व्यक्त केले.
बी. एस. कुलकर्णी सरांनी त्यांच्या उपदेशपर भाषणामध्ये सोलापूरसाठी कंबर तलावाचे महत्त्व पटवून दिले आणि त्याची त्यातील जैविक विविधता त्यावर प्रकाश टाकला. कंबरतलाव आणि त्या परिसरातील वन्यजीवन यांची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या उपक्रमामुळे या गोष्टीसाठी चालना मिळेल असे मत व्यक्त केले. त्यांना या लपणगृहाची संकल्पना खूप आवडली असून त्यासाठी त्यांनी येथील वनाधिकारी आणि डॉ. व्यंकटेश मेतन यांचे अभिनंदन केले. माणूस निसर्गात रमला की त्याचा आयुष्य सुंदर आणि सदृढ राहतं असाही चला सल्ला दिला. प्रवीण कुमार बडगे सरांनी हा उपयुक्त प्रकल्प राबविल्याबद्दल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
डॉ. व्यंकटेश मेतन यांनी मागील वर्षी ह्या लपणगृहासाठी सौ सुवर्णा माने विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर यांच्याकडे प्रस्ताव मांडला. सोलापूर पक्ष्यांचे नंदनवन आहे येथे असून स्मृतीवनामध्ये बाराही महिने आणि हिवाळ्यात स्थलांतरित होऊन येणारे अनेक पक्षी येथे वावरतात. यासाठी हा प्रकल्प स्मृतिवन विहारात करावा हे सुचविले.या प्रस्तावात या लपणगृहाचे उद्देश आणि फायदे मांडले. त्यांनी तो प्रस्ताव सरकारकडे पाठवला आणि त्याचा अत्यंत चिकाटीने त्याचा पाठपुरावा करून ह्या प्रस्तावाला मंजुरी मिळवली. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी वनाधिकारी सुवर्णा माने यांचे आभार मानून अभिनंदन केले. हे लपणगृह तयार करण्यासाठी वैभव होमकर यांची मोलाची साथ मिळाली. डॉ. व्यंकटेश मेतन यांनी एक नागरिक म्हणून हा प्रस्ताव मांडला होता आणि त्याची दखल घेऊन येथील वन अधिकारी यांनी हा प्रकल्प उभा केला त्यामुळे त्यांचे शतशः आभार मानले.
सोलापूरकरांसाठी हा संकल्प राबविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले असून नजीकच्याकाळात सोलापूरमध्ये दोन मोठे प्रकल्प होण्यासाठी शासनांकडे प्रस्ताव मांडणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमासाठी सोलापुरातील अनेक पक्षीमित्र आणि छायाचित्रकार वन्यजीवन छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये अरविंद कुंभार, रश्मी माने, सचिन जोग, सिद्राम पुराणिक, नागेश राव, निलेश भंडारी, ऋतुराज कुंभार, प्रीती श्रीराम, परशुराम कोकणे, शिवाजी सुरवसे, साबळे, संजय भोईटे, महेश बनसोडे, सिद्धाराम सक्करगी आदी उपस्थित होते.