सोलापूर : नाट्यकेशी अकॅडमी ऑफ परफार्मीग आर्टस्च्या १० व्या वर्धापनानिमित्त सुरु केलेल्या कल्पतरु राष्ट्रीय नृत्य महोत्सवाचे यंदा ३ रे वर्ष असून दि. ८ व ९ फेब्रुवारी रोजी किर्लोस्कर सभागृह, एच.एन. लायब्ररीच्यावर सायंकाळी ५.३० ते ९.०० या वेळेत हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरचे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते होणार असून सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु मृणालीनी फडणवीस, प्रसिध्द तबला वादक पंडित आनंद बदामीकर व सुप्रसिध्द नेत्ररोग तज्ञ डॉ. उमा प्रधान उपस्थितीत राहणार असल्याची माहिती हृषीकेश पागे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दि. ८ फेब्रुवारी रोजी भरतनाट्यम व कथक जुगलबंदी हे विशेष आकर्षण राहणार आहे व दि.९ फेब्रुवारी रोजी ‘राधा’-Eternal Saga of Womenhood ही नृत्य नाटीका सादर होणार आहे. दिल्ली येथे झालेल्या निर्भया हत्याकांडाची पार्श्वभूमी असलेली ही नृत्य नाटीका आहे. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मधुसुदन भुतडा, उपाध्यक्ष प्रीती राठी, सहसचिव शिरिष देखणे तसेच वर्षा मगजी, डॉ.जया कोटा, श्री. संदिप लिगाडे, प्रिती लोणावत, सौ. बसवंती, सौ. फेलमारे, सौ. रायकर, सौ. भंडारी आदी परीश्रम घेत आहेत. तरी सोलापूरच्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद देऊन, कार्यक्रमाचा आस्वद घ्यावा असे आवाहन संस्थेचे सचिव हृषीकेश पागे यांनी केले आहे.