सोलापूर – ( प्रतिनिधी ) – मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट जनतेसाठी खुले करण्यात आले असून कंदलगाव येथे १८ एकर जागेवरील देखणा प्रकल्प सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वैभवात निश्चितच भर टाकेल असा विश्वास कंदलगावचे सरपंच रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला. स्वर्गीय नागेश करजगी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी सरपंच पाटील यांच्या हस्ते वॉटर प्रकल्पाच्या यंत्रणेची कळ दाबून वॉटर पार्कचा शुभारंभ करण्यात आला,यावेळी सरपंच पाटील बोलत होते.
प्रकल्पाबाबत माहिती देताना संस्थापक कुमार करजगी म्हणाले, सोलापूरच्या जवळपास एकही अमेझमेंट किंवा वॉटर पार्क नाही. त्यासाठी सोलापूरकरांना १०० किलोमीटर अंतरावर आनंद लुटण्यासाठी जावे लागले. याचा विचार करून कामगार नेते कुमार करजगी यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मंद्रूप – कामती चौपदरी रस्त्याला लागून मोहिनी वॉटर पार्क अँड रिसॉर्ट सुरु केले आहे. १८ उभारण्यात आलेल्या वॉटर पार्कमध्ये अनेक सोइ उपलब्ध करून आहेत. वॉटर स्पोर्ट्स,रेन डान्स ,नौकाविहार,वॉटर गेम आदींचा आनंद लुटता येणार आहे. सोबत अम्युझमेंट पार्कची मज्जा देखील अनुभवास मिळणार आहे. लहान मुलांसाठी विविध राइड्स,मोठ्यांसाठीसुद्धा थरारक राइड्स उपलब्ध आहेत. बांबू हाऊस बरोबरच पंचतारांकित रूम्स याठिकाणी राहण्यासाठी उपलब्ध आहेत. विविध कंपन्या,संस्था आदींना या ठिकाणी बैठका व हॉलदेखील सुसज्ज ठेवण्यात आला आहे. यामध्ये एकदिवसीय शिबीर,कार्यशाळा,सेमिनार घेता येणार आहेत. या सर्वांसोबत निसर्गोपचार केंद्रदेखील उभारण्यात आले आहे.
या ठिकाणी विविध आजारांवर उपचाराची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सोलापूर शहरापासून २२ किलोमीटर अंतरावर असणारा हा वॉटर पार्क सोलापूर शहर आणि जिल्हावासीयांसाठी एकप्रकारची पर्वणीच ठरणार आहे. कुटुंबियांसमवेत रविवारची सुट्टीची मजा बालगोपाळांसह लुटता येणार आहे. याशिवाय थ्रीडी गेम्स,थियेटर ,रेल्वे गाडी आदींचासुद्धा आनंद लुटता येणार आहे, असेही कुमार करजगी यांनी यावेळी बोलताना म्हणाले .
यावेळी कंदलगाव ग्रामपंचायतीचे सदस्य सोमनाथ जोकारे ,यशराज करजगी योगीनाथ चिडगुंपी, सुरेंद्र कर्णिक, राजाराम चव्हाण ,संतोष हसापुरे, उमेश बने, गणेश पोतदार,बाळासाहेब शेतसंदी,मुंजप्पा कोले, अशोक कोले,तुळजाराम नरोटे,अमर पाटील,चंद्रकांत निंगफोडे,ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील,आनंद कोले, सुधाकर जोकारे आदी उपस्थित होते.