सोलापूर : राजमाता जिजाऊ यांच्या मुळेच छांत्रपती शिवराय घडले त्यांनी हिदंवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपला देशात युवकांची संख्या मोठी आहे. तेव्हा आदर्श महापुरुषांची प्रेरणा घेत युवकांनी ध्येयाचा ध्यास घेऊन प्रयत्नशील रहावे. असे आवाहन स्त्रीरोग व वंध्या निवारण तज्ञ डाँ.शिला पटवर्धन यांनी केले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने समाजकल्याण केंद्रात रविवारी आयोजित युवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलेत होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद वित्त विभागाचे सहाय्यक संचालक धनराज पांडे, लोकमंगल बँकेचे व्यवस्थापक दिनकर देशमुख, मारवाड़ी युवा मंचाचे माझी अध्यक्ष शामसुदंर खडेलवाल, सामाजिक कार्यकर्ती निर्मला बलदवा, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदि मान्यवर उपस्थित होते.
डॉ.पटवर्धन पुढे म्हणाल्या, राजमाता जिजाऊ आणि छात्रपती शिवराय यांच्या विचाराच्या संस्कृतीची गरज आहे.आजची युवा पिढी संभ्रमात आहे. त्यांनी ध्येय निश्चितच करून ते सिध्दीसाठी प्रयत्न करावे. मुली व महिलांचा सन्मान राखला पाहिजे.
प्रास्ताविक भाषणात संस्थापक महेश कासट यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा सांगितला. युवकांना प्रेरणा मिळावी म्हणूनच हा पुरस्कार सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. कार्यक्रमचे सुत्रसंचालन नर्मदा मिठ्ठा-कनकी तर आभार प्रदर्शन डॉ. राजदत्त रासोलगीकर यानी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शंकर बंडगर, सतोष अलकुटे, विनोद करपेकर, पंकज सगवे, मल्लिकार्जुन यणपे, अक्षय हुणगुद, सचिन जाधव, विजय जाधव, रुपेश भोसले, अभिजित होनकळस, मोहन तलकोकुल, दिपक बुलबुले, आकाश लखोटिया, सौरभ करकमकर, मोहन वड्डेपल्ली, शीला तापडिय़ा, माधुरी चव्हाण, अंजली शिरसी, शुभांगी लचके यानी प्रयत्न केले.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
सपोनि ज्योती कडू, रत्ना सोनवणे ( दामिनी पथक सर्व स्टाफ), उद्योजक उज्वल बागडी (स्वस्तिक रोटोमँटिक), उद्योजक पारस शाहा(फॅक्टरी फ्रेश), प्राचार्य. प्रमोद हंचाटे (हिंगुलाबिका प्राथमिक शाळा), निरंजन बोध्दूल (शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्था), किरण लोंढे ( संकल्प सामाजिक संस्था ) आदिना पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ पुरस्काराचे स्वरूप आहे.