दिल्ली : दिल्लीची निवडणूक दिल्लीचं भविष्य ठरवणार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीतले नागरिक जे मतदान करतील त्यामुळेच दिल्लीचं भवितव्य बदलणार असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलीच प्रचारसभा घेतली. याच प्रचारसभेत दिल्लीचा सर्वतोपरी विकास करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं आहे.