सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत “हर घर नल से जल “या योजनेची जिल्हा परिषद सोलापूर यांनी अक्कलकोट ,दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माळशिरस, माढा व करमाळा या तालुक्यातील ४०५ पाणी पुरवठा योजना राबवणे करिता नाबार्ड कन्सलटंसी सर्विसेस मुंबई यांची प्रकल्प सल्लागार म्हणून शासनातर्फे डिसेंबर २०२२ मध्ये नियुक्ती केली आहे. सर्व योजनांच्या कामाची अंमलबजावणी ही शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार योग्य व विहीत वेळेत पूर्ण करण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबधित क्षेत्रीय अभियंत्याची योजनाच्या सर्व तांत्रिक बाबीचे प्रशिक्षण देण्याकरिता नाबार्ड कन्सलटंसी सर्विसेस मुंबई तर्फे दि.११ व १२ जुलै रोजी कार्यशाळा व प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर भेट देऊन क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित केले होते.
कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी तांत्रिक प्रशिक्षणाचे कार्यशाळेला उपसथीत राहून मार्गदर्शन करून कार्यशाळेचे प्रशिक्षणाला सुरुवात केले. कार्यशाळेचे प्रशिक्षण वरिस्ठ तांत्रिक सल्लागार रवींद्र ठाकूर, प्रकल्प समन्वयस्क अरुण सिंह ,तेसज मते, गौरव कुमार यांच्या तर्पे देण्यात आले. प्रशिक्षणा दरम्यान पहिल्या दिवसी तांत्रिक प्रशिक्षण व दुसऱ्या दिवसी नांदणी ता दक्षिण सोलापूर येतील जल जीवन मिशन अंतर्गत प्रगती पतावर असलेल्या कामावर सर्व प्रशिक्षणार्ती सह भेट देहून क्षमता बांदणी प्रशिक्षण दिले. यावेळी नाबार्ड कन्सलटंसी सर्विसेस सोलापूर चे टीम लीडर श्री विरभद्र स्वामी, वरिस्ठ अभियंते सी ए पाटील, शंकर बिराजदार व २५ क्षेत्रीय अभियंते उपस्तीत होते .