सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 सोमपा विभागीय क्र 5 येथील बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन आज आमदार प्रणिती शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक विजयकुमार शिंदे, लताबाई भिसे, रसूल शेख, अतुल गायकवाड, बापू क्षीरसागर, श्रीकांत बोराडे, कदम, जोगदंड,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, उपअभियंता किशोर सातपुते,विभागीय अधिकारी सतीश एकबोटे,नागनाथ बाबर,अवेशक किशोर तळीखेडे , अभिजित बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.
मा.उप मुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महोदयांनी जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा व नगर पंचायती यांच्याकडे उपलब्ध असलेल्या इमारतीमध्ये स्वनिधीतून जेष्ठ नागरीक विरंगुळा केंद्रे तातडीने सुरु करावेत व तेथे जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, विविध बैठे खेळ तसेच इनडोअर खेळ आणि अन्य करमणुकीच्या सुविधा उपलब्ध करून देणे बाबत उप सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडून दि. १५ जून २०२३ ने कळविण्यात आले होते.
सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 सोमपा विभागीय क्र 5 येथील बागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्यात आले आले असून . सोलापूर शहरातील या ठिकाणी जेष्ठ नागरिक हे सकाळी व सायंकाळी वॉकिंग साठी येत असतात. त्याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना व्हावा म्हणून या ज्येष्ठ नागरिक केंद्राची उभारणी करण्यात आली. या केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचण्यासंदर्भात वर्तमानपत्र, कॅरम, बुद्धिबळ, लुडो गेम विविध बैठक खेळ, इनडोर खेळ अन्य करमणुकीचे सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहे. हे केंद्र सकाळी सहा ते नऊ व सायंकाळी चार ते आठ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. तरी ज्येष्ठ नागरिकानी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रणितीताई शिंदे यांनी केले.