सोलापूर :माघवारी पालखी सोहळ्याचे शुक्रवारी भव्य असे गोल रिंगण होऊन रात्री सोलापुरात मुक्काम झाल्या नंतर, शनिवारी सकाळी माघ वारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. तद्पर्वी माघवारी पालखी सोहळ्यातील अश्वाचे मानकरी वै.ह.भ.प.सौदागर (भाऊ) जगताप यांच्या प्रतिमेला अखिल भारतीय वारकरी मंडळा कडून पुष्पहार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे,जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्योतिराम महाराज चांगभले,शहर सचिव मोहन महाराज शेळके,ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भोंगे,औदुबर जगताप,दगडू डोंगरे तसेच विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ गवळी वस्ती चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते…
तसेच लक्ष्मी चाळ येथे अश्वाचे पूजन माजी महापौर दिलीप कोल्हे, सुनिल खटके,महादेव गवळी,तिऱ्हे मार्गे पालखी अध्यक्ष सुमंत शेळके,उमाकांत निकम,मोहन शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तिऱ्हे मार्गे २२ दिंड्या निघाले असून आज कामती येथे सर्व दिंड्याचा मुक्काम असणार आहे.