सोलापूर:- समाजातील प्रत्येक घटकाचे हित जोपासण्याचे काम प्रशांत बडवे यंानी आजपर्यतच्या आपल्या आयुष्यात केले आहे असे गौरवोद्गार जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग रजपूत यांनी काढले. प्रशांत बडवे यांच्या एकसष्ट्री निमित्त मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार शिवस्मारक सभागृहात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दाते पंचागकर्ते मोहन दाते, तरूण भारतचे संचालक दिलीप पेठे, हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे, प्राजक्ता बडवे,शैलजा रत्नपारखी आदी उपस्थित होते.
समाजातील लोकांना आपली काहीतरी मदत व्हावी असा विचार घेवून आजपर्यतच्या आयुष्यात प्रशांत बडवे यांनी कार्य केले. लोकांच्या प्रत्येक अडचणीला धावून मदतीचा हात देणारे प्रशांत बडवे यांनी लोकहिताला प्राधान्य दिले. पैसा कमावण्यापेक्षा माणसे कमावले पाहिजे आणि तेच काम प्रशांत बडवे यांनी केले असेही अॅड.प्रदीपसिंग रजपूत यांनी सांगितले.
लहानपणापासूनच हरहुन्नरीपणा प्रशांत बडवे यांच्यामध्ये आहे. इतरांना मदत करण्याची त्यांच्या मनात नेहमी आवड असते ते नेहमी प्रतिकुल तेच घडेल या वा्नयावर चालत आलेले आहेत असे आपल्या मनोगतामधून पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.
अनेकांना कळत न कळत सहकार्य करण्याची वृत्ती प्रशांत बडवे यांच्यामध्ये आहे. एखाद्या माणसाला जमीनीवरून उचलून उंच आकाशात बसवण्याचे कसबही बडवे यांच्यामध्ये आहे त्याचे अनेक उदाहरण आहेत. अजातशत्रु असलेले प्रशांत बडवे यांनी कायम आपल्या सोबत माणसांचा गोतावळा निर्माण केला. असे आपल्या मनोगतामधून हास्यसम्राट प्रा.दिपक देशपांडे यांनी सांगितले. अनेक खोड्या माझ्यासोबत करत असलेला माझा लहान भाऊ माझ्या मागे नेहमी असायचा परंतु आजचे त्याचे वैभव पाहिले असता तो माझ्या किती पुढे गेला याची प्रचिती येते अशा भावना शैलजा रत्नपारखी यांनी व्यक्त केल्या. नंतर अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून प्रशांत बडवे यांना एकसष्टी निमित्त शुभेच्छा दिल्या.
मला या सत्काराची कसलीच कल्पना न देता हा एवढा मोठा कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल आभार व्यक्त करून आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रशांत बडवे यांनी शिरीष कुलकर्णी या आपल्या गुरूला वंदन केले. मी घडलो ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून त्यातूनच मला लोकांच्या हिताचे काम करण्याची प्रेरणा मिळाली. लहान पणापासूनच मी कुठेतरी नोकरी करावी असे घरातील लोकांना वाटायचे परंतु आपण नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे होवू असे मनाशी ठरवूनच माझ्या कार्याची वाटचाल केली त्यामध्ये मला दिलीप पागे यांच्या सारख्या अनेकांचे सहकार्य लाभले आजपर्यत समाजासाठी कार्यरत राहिलो यापुढेही समाजासाठीच कार्यरत राहणार असे आपल्या सत्काराला उत्तर देताना प्रशांत बडवे यांनी सांगत असतानाच ते भावूक झाले.
प्रारंभी अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर एकसष्टी निमित्त प्रशांत बडवे यांचा मान्यवरांच्या तसेच मित्र परिवारांच्या वतीने पुष्पहार,फेटा,शाल आणि श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी दातेपंचागकर्ते मोहन दाते यांचाही वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी या कार्यक्रमात आभार अबोली बडवे गलगली यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी रवि हलसगीकर, सात्विक बडवे, पृथा हलसगीकर, राऊत मंडप डेकोरेटर्सचे राहुल राऊत, विनायक होटकर, किशोर रच्चा यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला समर्थ बँकेच अध्यक्ष दिलीप अत्रे, जनता बॅकेचे संचालक जगदीश तुळजापूरकर,अॅड.बसवराज सलगर, राष्ट्रवादीचे सुधीर खरटमल, भारतीय जनता पक्षाचे शहाजी पवार, अविनाश महागांवकर यांच्यासह प्रशांत बडवे यांच्या दहावीच्या वर्गातील सर्व वर्गमित्र मैत्रिणी, हरिभाई देवकरण प्रशालेतील त्यांचे मित्र मैत्रिणी, इले्नट्रीकल्स असोसिएशन, बँकींग क्षेत्रातील मित्र, पत्रकार, साहित्य परिषद, नाट्य परिषद या सर्व क्षेत्रातील मित्र सहकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.