सोलापूर – प्रिसिजन मार्फत एनसीसी 38 महाराष्ट्र बटालिएन येथे देण्यात आलेल्या सौरपंपाचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास डॉ सुहासिनी शहा, एनसीसी बटालियनचे सीओ राजेश गजराज, विक्रम जाधव, मेजर अरुण कुमार, सतीश कुमार इ प्रमुख अतिथी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ शहा बोलताना म्हणाल्या की एनसीसी हे देशाच्या भावी सैनिकांचे ट्रेनिंग सेंटर आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशासाठी कर्तव्य बजावत असणाऱ्या सैनिकांच्या वसाहतीमध्ये प्रिसिजनला सेवा करण्याची संधी मिळाली.
एनसीसी 38 बटालियनचे सोलापूरमध्ये यूनिट ऑफीस व मिलेटरी वसाहत आहे. या वसाहतीमधील पाणी पुरवठ्याची व्यवस्था सौरऊर्जेवर करण्यात आली. प्रिसिजन कंपनीच्या सीएसआर फंडातून सौरपंप बसविण्यात आले. 5 एचपीचे 2 पंपासाठी 5.5 केव्ही 2 सोलार प्लांट बसविण्यात आले आहेत. या सोलारमूळे वर्षाला 3.5 ते 4 लाख वीजबिल वाचणार आहे.
या प्रकल्पासाठी तांत्रिक साहाय्य जोगिश्वरी सोलार सर्व्हिसेसनी केले. सदर कार्यक्रमास मिलिटरी वसाहती मधील सर्व कुटुंबे तसेच सर्व अधिकारी व सैनिक उपस्थित होते.