सोलापूर : अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी महोत्सव वर्षे सुरू असून त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित अनेक कार्यक्रम महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात राबवले जात आहे. अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र सामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी चित्रपट हे एकमेव माध्यम असल्याने आधार क्रिएशन निर्मित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे एक जीवनसंघर्ष यावर आधारित अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट उलगडणारा चित्रपट निर्मिती होणार आहे या चित्रपटाचे पोस्टर लाँचिंग करण्यात आलाय यासंदर्भात अधिक माहिती धम्मपाल माशाळकर यांनी दिली. यावेळी वैशाली गुंड विजयकुमार हत्तुरे, विक्रम खेलबुडे, राहुल चौरे, देविदास गायकवाड, सुजाता मैत्रे आदी उपस्थित होते.